Wednesday, March 29, 2023

सोन्याच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, एका दिवसात सोने-चांदी झाले 5000 रुपयांनी स्वस्त

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत गेल्या 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारातही किंमती घसरल्या आहेत. मंगळवारी, बुधवारीसुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती या प्रति दहा ग्रॅम 1000 रुपयांपेक्षा कमी घसरल्या. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 5,172 रुपयांनी कमी झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारातील सोन्याच्या किमतीत गेल्या 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदली गेली आहे. कॉमेक्सवरील सोन्याचे दर हे प्रति औंस 1932 डॉलर पर्यंत खाली आले आहेत.

सोन्याचे नवीन दर
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतच्या सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्रॅम 54,174 रुपयांवरून घसरून 52,946 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किंमती 1,228 रुपयांनी घसरल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53951 रुपयांवर आली आहे.

- Advertisement -

चांदीचे नवीन दर
मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 72,756 रुपयांवरून 67,584 रुपयांवर आली आहे. या काळात किंमती 5,172 रुपयांनी घसरल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर हा प्रति किलो 71211 रुपयांवर आला आहे.

सोन्या-चांदीच्या किंमती का घसरल्या
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांचे म्हणणे आहे की अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 1930 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले आहेत. तसेच रशियाने बनवलेल्या कोरोना विषाणूच्या लसीमुळे ग्लोबल सेंटीमेंट सुधारल्या आहेत. ज्यामुळे शेअर बाजारात जोर परतला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री जोरात केली. मंगळवारी रात्री खरेदी अमेरिकन शेअर बाजाराकडे परत आली, यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता शेअर बाजाराकडे वळला आहे. कोरोना लसीच्या बातम्यांचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. अमेरिकन शेअर बाजाराचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स S&P 500 हा नवीन विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला.

भारतात सोनं किती स्वस्त होईल
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लसीची बातमी येईलच. अशा प्रकारे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढेल. सद्यस्थितीत सोन्याच्या किंमतीत 5-8 टक्क्यांनी घसरण होऊ शकते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in