हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (13 डिसेंबर रोजी) भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींत घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीलाच सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. MCX वर आज कालच्या बंद किंमतींच्या तुलनेत 0.54 टक्क्यांनी वधारली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या सत्रात चांदीचा दर 0.38 टक्क्यांनी घसरला होता. Gold Price Today
आज MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 9:10 पर्यंत 58 रुपयांनी वाढून 54,190 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.तसेच आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदी देखील ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 366 रुपयांनी वाढून 68,152 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने रेड मार्कवर ट्रेड करत आहे तर चांदीमध्ये तेजी दिसून येते आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.61 टक्क्यांनी घसरून $1,784.05 प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 0.19 टक्क्यांनी वाढून 23.39 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,800 रुपये
पुणे – 49,800 रुपये
नागपूर – 49,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,330 रुपये
पुणे – 54,330 रुपये
नागपूर – 54,330 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
12 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
11 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
10 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
09 Dec 2022 | ₹ 5,058 | ₹ 40,464 | ₹ 5,311 | ₹ 42,488 |
08 Dec 2022 | ₹ 5,033 | ₹ 40,264 | ₹ 5,285 | ₹ 42,280 |
07 Dec 2022 | ₹ 5,033 | ₹ 40,264 | ₹ 5,285 | ₹ 42,280 |
06 Dec 2022 | ₹ 5,013 | ₹ 40,104 | ₹ 5,264 | ₹ 42,112 |
05 Dec 2022 | ₹ 5,043 | ₹ 40,344 | ₹ 5,295 | ₹ 42,360 |
04 Dec 2022 | ₹ 5,028 | ₹ 40,224 | ₹ 5,279 | ₹ 42,232 |
03 Dec 2022 | ₹ 5,028 | ₹ 40,224 | ₹ 5,279 | ₹ 42,232 |
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे, कसे ते जाणून घ्या
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो ??? कारण जाणून घ्या
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट