Gold Price today: चांगली बातमी! स्वस्तात सोने खरेदी करण्याची चांगली संधी, खरेदीपूर्वी आजची किंमत तपासा

नवी दिल्ली । आज सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली आहे, परंतु जर आपण देखील स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम वेळ आहे. आजकाल सोने 8 महिन्यांच्या निम्न स्तरावर ट्रेड करीत आहे, म्हणून आपणास स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. गुरुवारी सकाळी, एप्रिलमधील फ्यूचर ट्रेड 206.00 रुपयांनी वाढून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchnage) वर 46,443.00 रुपयांवर होता.

किती स्वस्त झाले आहे
त्याशिवाय चांदीचा फ्यूचर ट्रेड 159.00 रुपयांच्या वाढीसह 69,390.00 रुपयांवर होता. ऑगस्ट महिन्यात सोन्याने प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांचा उच्चांक नोंदविला होता. त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे भाव सुमारे 9800 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास आजही सोन्याला वेग आला आहे. अमेरिकेतील सोन्याचा ट्रेड 7.22 ने वाढून प्रति औंस 1,783.81 डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीची किंमत 0.06 डॉलरने घसरून 27.31 डॉलर पातळीवर पोहोचली.

18 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत सोन्याची किंमत
>> 22 कॅरेट सोनं – 45890 रुपये
>> 24 कॅरेट सोनं – 50060 रुपये
>> चांदीची किंमत – 69200 रुपये

दिल्ली सराफा बाजार काल कोणत्या दरावर बंद झाला
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 717 रुपयांची घसरण झाली, त्यानंतर राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या नवीन सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,102 रुपये होते. याखेरीज चांदी 1,274 रुपयांनी घसरून 68,239 रुपये प्रतिकिलोवर आली.

अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सोन्या-चांदीवरील आयात करात (Import Tax) मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील आयात शुल्कामध्ये 5 टक्के कपात आहे. सध्या सोन्या-चांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. 7 टक्के वजा केल्यानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होत असल्याचे दिसून येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like