हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदारांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 69602 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोनं 519 रुपयांनी महागले आहे तर चांदीच्या दरात सुद्धा ५१९ रुपयांनी वाढ झाली असून सध्या एक किलो चांदी 84170 रुपयांवर व्यवहार करत आहे. मागील २-३ दिवसात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांना मोठा झटका मानला जातोय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६९५५३ रुपयांपासून (Gold Price Today) सुरु झाला. मात्र थोड्याच वेळात सोन्याचा भाव घसरून ६८४७५ रुपये झाला. त्यानंतर मात्र सोन्याच्या किमती या वाढतच गेल्या. ११ वाजून १० मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याने ६९६०९ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या सोन्याचा भाव 69602 रुपयांवर व्यवहार करत आहे. गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६४५०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७०३६० रुपये तोळा आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 64,500 रुपये
मुंबई – 64,500 रुपये
नागपूर – 64,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 70,360 रूपये
मुंबई – 70,360 रूपये
नागपूर – 70,360 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.