Gold Price Today : भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज १६ फेब्रुवारी २०२४ रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत अंदाजे 62,290 रुपये आहे, तर 22-कॅरेट सोन्याची किंमत 57,100 रुपये होती. आज सकाळी MCX वर 61,624 रुपयांवर सक्रियपणे व्यवहार करत होते. त्यानंतर यामध्ये वाढ सुरु झाली. तर दुसरीकडे चांदी ७१,४१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,३४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Good Return वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 5,7250 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 6,2440 रुपये आहे. तर चांदीचा दर 75600 रुपये प्रतिकिलो इतका आहे. सध्याचा काळ हा लग्नसराईताचा असल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांची पाऊले वळत आहेत. अशावेळी सोने- चांदीच्या दरात (Gold Price Today) होणार्या बदलाकडे सर्वांचे लक्ष्य राहत आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,100 रुपये
मुंबई – 57,100 रुपये
नागपूर – 57,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,290 रूपये
मुंबई – 62,290 रूपये
नागपूर – 62,290 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.