Gold Price Today : पितृपक्षात सोने-चांदी झालं स्वस्त; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव संपल्यानंतर १७ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करत असतात, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचं ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत असं म्हंटल जात. याच पार्श्वभूमीवर पितृपक्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव किती रुपये तोळा आहे याची माहिती जाणून घेऊयात….

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३१८० रुपयांनी सुरु झाला, मात्र मार्केट सुरु झाल्यापासून सोन्याच्या किमती घसरायला सुरुवात झाली. १० वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतींनी ७२९१४ रुपयांचा निच्चांक गाठला. त्यानंतर या किमतीत थोडी वाढ पाहायला मिळाली. सध्या १ तोळा २४ कॅरेट सोने ७३०३० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा 336 रुपयांची घसरण झाली असून १ किलो चांदीचा दर 88734 रुपये आहे. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 68, 500 रुपये
मुंबई – 68, 500 रुपये
नागपूर – 68, 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74, 730 रूपये
मुंबई – 74, 730 रूपये
नागपूर – 74, 730 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.