Gold Price Today : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या किमती घसरल्या; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज ९ मे २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71115 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत ०. ०२ टक्के म्हणजेच १४ रुपयांची किरकोळ घट झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत 66१५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 7,2१६० रुपये आहे. तर चांदीची किंमत प्रतिकिलो ८५२०० रुपये आहे.मागील २-३ महिन्यापासून सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) चढ- उतार हे असेच सुरु आहेत. परंतु सध्याचा काळ हा अक्षय्य तृतीयेचा असून या काळात सोन्याला चांगली मागणी पाहायला मिळते. त्यामुळे ग्राहकवर्गाचे सोन्याच्या भावावर (Gold Price Today) बारकाईने लक्ष्य आहे .

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)– Gold Price Today

पुणे- 66,150 रुपये
मुंबई – 66,150 रुपये
नागपूर – 66,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम) Gold Price Today

पुणे- 72,160 रूपये
मुंबई – 72,160 रूपये
नागपूर – 72,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.