Gold Price Today: स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा खाली आल्या आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किंमती सलग 4 दिवस कमी होताना दिसत आहेत. जर पाहिले तर सोन्याच्या विक्रमी उच्चांपेक्षा 8,000 रुपयांनी स्वस्त दर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज सोन्याच्या किंमतीत प्रति ग्रॅम दहा रुपयांनी घट झाली आहे. यासह, 22 कॅरेटचा दर 47,950 वर आला तर 24 कॅरेटची किंमत खाली 48,950 वर आली.

22 कॅरेट सोन्याची किंमत

दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅम 46,690 रुपये आहे.

मुंबईत प्रति 10 ग्रॅम 47,950 रुपये आहे.

चेन्नईमध्ये ते प्रति 10 ग्रॅम 46,150 रुपये आहे.

कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 47,740 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत

दिल्लीमध्ये दर प्रति 10 ग्रॅम 50,890 रुपये आहे.

मुंबईत प्रति 10 ग्रॅम 48,950 रुपये आहे.

चेन्नईमध्ये ते प्रति 10 ग्रॅम 50,350 रुपये आहे.

कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 50,440 रुपये आहे.

Silver Price Today

दिल्लीत प्रति 1 किलो 71,600 रुपये आहे.

मुंबईत प्रति 1 किलो 71,600 रुपये रुपये आहे.

चेन्नईमध्ये प्रति 1 किलो 76,300 रुपये आहे.

कोलकातामध्ये हा दर प्रति 1 किलो 71,600 रुपये आहे.

याप्रमाणे अचूकता तपासा
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासून पाहायचे असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘BIS Care app’ सह ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंदर्भात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकेल. या अ‍ॅप (App) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment