Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजच्या किंमती तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात सुरू असलेल्या तेजीचा परिणाम आज भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. आज सकाळपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा 51 हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 31 रुपयांनी वाढून 50,865 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याच्या फ्युचर्स किंमती मागील क्लोझिंग प्राईसच्या तुलनेत 0.06 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या भावातही तेजी दिसून आली. MCX आज सकाळी चांदीचा भाव 157 रुपयांनी वाढून 61,094 रुपये प्रति किलो झाला.सध्या चांदीच्या फ्युचर्सची किंमत मागील क्लोझिंग प्राईसच्या तुलनेत 0.26 टक्क्यांनी वर आहेत.

जागतिक बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.26 टक्क्यांनी वाढून $1,843.86 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 0.42 टक्क्यांनी वाढून 21.74 डॉलर प्रति औंस झाला. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,130 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,080 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,130 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,800 रुपये
नागपूर – 47,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,080 रुपये
पुणे – 52,130 रुपये
नागपूर – 52,130 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4770.00 Rs 4770.00 0 %
8 GRAM Rs 38160 Rs 38160 0 %
10 GRAM Rs 47700 Rs 47700 0 %
100 GRAM Rs 477000 Rs 477000 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5203.00 Rs 5203.00 0 %
8 GRAM Rs 41624 Rs 41624 0 %
10 GRAM Rs 52030 Rs 52030 0 %
100 GRAM Rs 520300 Rs 520300 0 %

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment