Gold Prices : सोन्या-चांदीचे भाव वाढले, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात वाढ झाल्यामुळे मंगळवारी भारतातील बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. या आधी जागतिक बाजारात सोन्याचा भाव एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेला होता. गेल्या काही सत्रांपासून सोन्यामध्ये घसरण होत होती. मात्र आज सोन्यामध्ये वाढ पहायला मिळाली.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 51,485 रुपये प्रति 10 ग्रॅम होती तर चांदीच्या फ्युचर्सची किंमत 65,421 रुपये प्रति किलोग्रॅम वर होती. यावेळी सोन्यामध्ये 0.18% तर चांदीमध्ये 0.47% वाढ नोंदवली गेली. गेल्या काही सत्रांमध्ये सोन्यामध्ये घसरण पहायला मिळाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्याचा परिणामही सोन्याच्या दरावर दिसून आला.

जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,902.46 डॉलर प्रति औंस वर आहे. यामध्ये 0.3% वाढ झाली तर सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 1,902.60 डॉलर प्रति औंस आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,910 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,860 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,910 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,450 रुपये
पुणे – 48,500 रुपये
नागपूर – 48,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,860 रुपये
पुणे -52,910 रुपये
नागपूर – 52,910 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4988.00 Rs 4988.00 0 %
8 GRAM Rs 39904 Rs 39904 0 %
10 GRAM Rs 49880 Rs 49880 0 %
100 GRAM Rs 498800 Rs 498800 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4904.00 Rs 4904.00 0 %
8 GRAM Rs 39232 Rs 39232 0 %
10 GRAM Rs 49040 Rs 49040 0 %
100 GRAM Rs 490400 Rs 490400 0 %

Leave a Comment