सोन्याच्या किंमती दुपटीने वाढण्याची शक्यता, पहा काय म्हणतायत एक्सपर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद आहे. मौल्यवान धातूंचे स्पॉट मार्केट बंद होण्याचे हे मुख्य कारण आहे. दरम्यान, फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीने प्रचंड उडी घेतल्याचे दिसून येत आहे.सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. पुन्हा एकदा ४६,२०० रुपये सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी विक्रमाची नोंद केली आहे.त्याचबरोबर तज्ञांचा असा विश्वास आहे की लवकरच ते प्रति १० ग्रॅम साठी ८२,००० पर्यंतही पोहोचू शकते.

२०२१ पर्यंत सोन्याचे दर १० ग्रॅम ८२,००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे
सोन्याच्या किंमतीत सध्या वाढ झल्याचे दिसून येत आहे. स्टॉक अ‍ॅण्ड बाँड्स सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत गुंतवणूकीच्या भूमिकेत जास्त आशा दर्शवित नाहीत म्हणून सोन्यामध्ये पैशांची गुंतवणूक करने आपलय साठी चांगले ठरू शकते. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या विश्लेषकांचे मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती २०२१ च्या अखेरीस प्रति औंस ३००० डॉलर पर्यंत वाढू शकतात. भारतीय दरामध्ये सांगायचे तर,जे सध्याच्या विनिमय दरावर सुमारे ८२,००० / १० ग्रॅम असू शकतात. गुरुवारी, एमसीएक्सवरील सोन्याचे वायदा ४६,३५२ / १०ग्रॅम वर बंद झाले. म्हणूनच, सुमारे दीड वर्षात, भारतातील सोन्याच्या किंमती सुमारे ७५ टक्क्यांनी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या १७५०डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे.

NRTTV ئێن ئاڕ تی

वैश्विक वित्तीय पावरहाउस,गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषकांनीही पिवळ्या धातूला आपली दांडी लावली आणि ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहता ते कच्च्या तेलापेक्षा हे चांगले असू शकते.मार्च अखेरीस, गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषकांनी असा अंदाज वर्तविला आहे की कच्च्या तेलाच्या किंमती नकारात्मक क्षेत्रात प्रवेश करू शकतात.जीडीपी, सेंट्रल बँक बॅलन्सशीट किंवा अधिकृत सोन्याचे साठे हे मुख्य निर्धारक राहतील. त्याचबरोबर,१८ महिन्यांच्या सोन्याचे लक्ष्य $ २,००० डॉलरवरून ३,००० डॉलर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वस्त सोन्याची खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी सरकारने २०एप्रिलपासून पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँडची विक्री सुरू केली आहे. यात २४ एप्रिलपर्यंत गुंतवणूक करता येईल. म्हणजेच तुम्हाला त्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. त्यात गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात ५००ग्रॅम पर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एक ग्रॅम किमान गुंतवणूक आहे. आपण या योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. योजनेंतर्गत गुंतवणूकीला वर्षाकाठी २.५% रक्कम मिळेल.सॉवरेन गोल्ड बाँडच्या पहिल्या हप्त्याला २०२०-२०२१ मालिकेचे नाव देण्यात आले आहे. आरबीआयने सांगितले की इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने प्रकाशित केलेल्या ९९९ शुद्ध सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीच्या आधारे याचा निर्णय घेतला जाईल. मालिकेच्या सोन्याच्या बाँडसाठी किंमत प्रति १० ग्रॅम ४६३९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन खरेदी केल्यास, प्रति ग्रॅम ५० रुपये किंवा १० ग्रॅम प्रति ५००​​रुपये सूट मिळेल. एसजीबी बँक (लघु वित्त बँक आणि पेमेंट बँक वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (एनएसई आणि बीएसई) मार्फत विकली जाईल.

सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ का
वास्तविक, कोरोनाव्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोसळली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार गुंतवणूकीची जोखीम लक्षात घेता सुरक्षित गुंतवणूक शोधत असतात. पिवळ्या धातू सोने हे गुंतवणूकदारांसाठी नेहमीच सुरक्षित गुंतवणूक असते.अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु असे असूनही, त्याच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार आहेत. सराफा बाजार बंद असूनही मध्यवर्ती बँका, फंड मॅनेजर आणि गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. उल्लेखनीय आहे की गेल्या आठवड्यात ७ एप्रिल रोजी देशी वायदा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ४५,७२० रुपयांवर पोचली. बाजारातील तज्ज्ञ असे मानत आहेत की या आठवड्यात सोने ४६,००० रुपयांच्या पातळीवर जाईल. जूनपर्यंत त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०००० रुपये एवढी असेल.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment