सोन्याच्या किंमती गडगडल्या; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण दिसून आली आहे. सोमवारी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र आज, म्हणजे मंगळवारी सोन्याची किंमत खाली आली आहे. आज किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६९६६ रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.

सोमवारी सोन्याच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती. सोमवारी संध्याकाळी किरकोळ बाजारात त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७८६१ रुपयांवर पोहोचली होती.

इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी एक हजार रुपयांपेक्षा खाली घसरून ४७०१० रुपये प्रति किलो झाली आहे. सोमवारी संध्याकाळी किरकोळ बाजारात ती ४८,१२० रुपये किलो विकली जात होती.

 

दुसरीकडे, सट्टेबाजांच्या जोरदार मागणीमुळे सोमवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ४७९ रुपयांनी वाढून ४७,८६० रुपयांवर आला.मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ४७९रुपये किंवा १.०१ टक्क्यांनी वाढून ४७,८६० रुपये झाला. १२,८८१ या लॉटसाठी उलाढाल झाली.

ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ४६९ रुपये किंवा ०.९९ टक्क्यांनी वाढून ४८,०३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, ज्याचा ९१२१ या लॉटसाठी उलाढाल झाली.बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी केलेल्या नव्या खरेदीमुळे सोन्याच्या वायद्याचे भाव वाढले आहेत.तर जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमधील सोन्याचे भाव ०.९५ टक्क्यांनी वधारून ते १,७७३ डॉलर प्रति औंस झाले.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment