Saturday, March 25, 2023

सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, चांदी घसरली; जाणुन घ्या आजचे भाव

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किंमतीने स्थानिक सराफा बाजारात किंचितसी वाढ नोंदविली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम केवळ 8 रुपयांची वाढ झाली आहे. या किरकोळ वाढीने दिल्लीतील सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,959 रुपयांवर गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याच्या किंमतीत ही किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. यापूर्वीच्या सत्रात गुरुवारी सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅम 49,951 रुपयांवर बंद झाले होते.

स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या स्पॉट किंमतीत घट नोंदवली गेली. त्यामुळे शुक्रवारी चांदीचे दर हे प्रति किलो 352 रुपयांनी घसरले. त्यामुळे चांदीचा दर हा 52,364 रुपये प्रति किलो झाला. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदीचा भाव गुरुवारी 52,716 रुपयांवर बंद झाला होता.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल शुक्रवारी सायंकाळी सोन्याचे जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर 0.56 टक्के किंवा 10.10 डॉलरच्या वाढीसह 1813.90 डॉलर प्रतिऔंसवर होते. याव्यतिरिक्त सोन्याची जागतिक किंमत ही सध्या 1808.87 डॉलर प्रति औंस होती, जी 0.29 टक्के किंवा 5.32 डॉलरने वाढत आहे.

त्याचबरोबर जागतिक पातळीवर शुक्रवारी कॉमेक्सवर त्याची फ्युचर्सची किंमत 0.17 डॉलरच्या वाढीस 19.14 डॉलर प्रति औंस होती. तसेच, चांदीची जागतिक किंमत ही सध्या 18.77 डॉलर प्रति औंस होती, ती 0.65 टक्क्यांनी किंवा 0.12 डॉलरने वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.