आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी सोने महागले, भारतात काय परिणाम होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या निर्देशांकातील कमकुवतपणामुळे आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे परकीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम आज सोन्याच्या देशांतर्गत वायदे बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारीही सोन्या-चांदीच्या भावात वाढ नोंदवली गेली. आज एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वितरणासाठीचे वायदे 0.7% वाढून प्रति 10 ग्रॅम 52,000 च्या पातळीवर पोचले. वायद्यात सोन्याच्या किंमती वाढण्याचे हे सलग तिसरे व्यापार सत्र आहे. त्याचप्रमाणे आज एमसीएक्सवरील चांदीचा वायदा 1.2% ने वाढून तो 71,300 प्रति किलो झाला. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 300 ने वाढले होते, तर चांदीने प्रति किलो 1,800 ने उडी घेतली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विकसित अर्थव्यवस्थांच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे आज सोन्या-चांदीच्या किंमती मजबूत झाल्या आहेत.

आज भारतात काय घडेल?
देशांतर्गत सराफा बाजारातही आज किंमती वाढू शकतात. सोमवारी, दिल्ली बुलियन मार्केटमधील 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52,477 रुपयांवरून 52,638 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. या काळात दर 10 ग्रॅमच्या किंमती 161 रुपयांनी वधारल्या, त्याचवेळी मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम 51405.00 रुपयांवर पोचल्या.

सोन्याच्या किंमती 2 आठवड्यांच्या उच्चांकावर पोचली:
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती जवळपास दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, परदेशी बाजारात सोन्याची किंमत 1,968.98 (सोन्याचे स्पॉट प्राइस) झाली आहे.

आता काय होईल?
कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात असे म्हटले आहे की, जागतिक कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना तसेच अमेरिका आणि चीनमधील तणावामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये चीनच्या कारखान्यातील कामकाजात किंचित वाढ झाली. जुलैमध्ये जपानच्या कारखान्याचे उत्पादन सलग दुसर्‍या महिन्यात वाढले. मात्र, किरकोळ विक्री सलग पाचव्या महिन्यात घसरली आहे. सोन्याच्या स्पॉट डिमांडविषयी बोलताना भारतातील सराफा व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोन्यावर बम्पर सवलत दिली. ही सवलत 5 महिन्यांत सर्वाधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment