सोन्याचे भाव पडले; ‘या’ कारणाने सोन झालं स्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा दरात ०.६६ टक्क्यांची घट झाली. सोने १० ग्रॅमला ४६३९० रुपये झाले आहे. चांदीचा भाव ०.६९ टक्क्यांनी कमी झाला असून प्रती किलो ४८४७४ रुपये झाला आहे.

येत्या काही सत्रात सोन्याचा भाव ४५९०० ते ४६९०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज एसएमसी सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. चांदीचा भाव ४८००० आसपास राहणार असून तो ४९३०० पर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटलं आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७२० डॉलरच्या दरम्यान आहे. चांदीचा भाव १८.१८ डॉलर प्रती औंस राहिला. युरोपातील केंद्रीय बँकांकडून किमान ५०० अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज घोषीत केले जाईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने चांदीवर परिमाण होण्याची शक्यता आहे.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment