Gold Rate Today : अरे बापरे ! आजही वाढला सोन्याचा भाव ; पहा 10 ग्रॅम साठी किती रुपये मोजावे लागणार ?

0
6
Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सतत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी तर सोनं रेकॉर्ड ब्रेक उंची गाठत असताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमती एवढ्या झपाट्याने का वाढत आहेत? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन सोने धोरणाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत असून त्यामुळे सोन्याचे दर (Gold Rate Today) गगनाला जाऊन भिडले आहेत. आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सोन्याचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट चे भाव काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

22 कॅरेट (Gold Rate Today)

आज 1 g 22 कॅरेट सोन्याचा दर आठ हजार साठ रुपये इतका आहे. हाच दर काल 7980 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 80 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार 600 रुपये इतका आहे. हाच दरकाल 79,800 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे.

24 कॅरेट

तर दुसरीकडे शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले असता आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8793 रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 87 हजार 930 रुपये इतका आहे. आज प्रति दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 870 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचा दर (Gold Rate Today)

चांदीचे दर पाहिले असता आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी चांदीच्या किमतींमध्ये (Gold Rate Today) घसरण दिसून येत आहे. चांदीची किंमत ही 99400 प्रति किलोग्राम वर आली आहे.

भारतात कशी ठरवली जाते सोन्याची किंमत?

भारताचा विचार केला तर सोन्याची किंमत बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे बदलत राहते. जसं की आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारचा टॅक्स आणि रुपयाची किंमत यातील चढ-उतार, सोने म्हणजे केवळ भारताच्या बाबतीत गुंतवणूक नव्हे तर आपल्या संस्कृतीचा (Gold Rate Today) एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. त्यामुळे लग्नकार्याचा सीझन असताना सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसून येते. एवढेच नाही तर सोन्याला एक चांगली गुंतवणूक म्हणून सुद्धा पाहिलं जातं. त्यामुळे सोन्याच्या किमतीतला चढ-उतारिचा परिणाम हा थेट इथल्या सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होत असतो.