Gold Rate Today : सोन्याने आज बाजारात जबरदस्त एंट्री घेतली आहे! गुंतवणुकीचा ‘बाप’ असलेल्या या झळाळत्या धातूचा दर आज थेट 1 लाखाच्या सीमारेषेवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका-चीन व्यापार संघर्षाने आणि गुंतवणूकदारांच्या अस्थिरतेने, सोन्याच्या (Gold Rate Today) दराला गगनचुंबी उचांकी प्राप्त झाली आहे.
सध्याचे दर आणि भविष्यातील अंदाज (Gold Rate Today)
आज २१ एप्रिल २०२५ रोजी सोमवारी सकाळी 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅमसाठी 99,500 रुपयांवर पोहोचलं. यामध्ये जीएसटी धरल्यास ग्राहकांना आता एक तोळा सोनं खरेदी करताना 1 लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. अक्षय तृतीया येण्याआधीच हा टप्पा पार झाल्याने, त्या दिवशी दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, वर्षाअखेरपर्यंत दर 2 लाखांपर्यंत जाऊ शकतो. सोनं नेहमीच ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानलं जातं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या काळात त्याचं मूल्य झपाट्याने वाढतं. मात्र सामान्यांसाठी आता सोनं खरेदी करणं खरोखरच स्वप्नवत होत चाललं आहे.
हे सोनं इतकं महाग का? सोन्याचा दर ठरतो कसा?
सोन्याचा दर ठरवताना अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांचा विचार केला जातो. हे दर रोज बदलत असतात. खाली दिलेले काही प्रमुख घटक दरात चढ-उतार घडवतात:
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती (Gold Rate Today)
लंडन बुलियन मार्केटमध्ये (LBMA) सोन्याचे व्यवहार आणि स्पॉट प्राइस हे जागतिक दर ठरवतात. तिथे सोन्याचा दर डॉलरमध्ये असतो.
डॉलरची किंमत
डॉलर मजबूत झाला तर भारतात सोनं महाग पडतं, कारण आपण आयात करत असलेलं सोनं डॉलरमध्ये खरेदी केलं जातं.
मागणी आणि पुरवठा (Demand & Supply)
सण, लग्नसराई आणि आर्थिक अनिश्चिततेत सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे दरही चढतात.
केंद्र सरकारचे आयात शुल्क व जीएसटी
भारतात सोनं आयात केलं जातं. त्यावर 15% आयात शुल्क आणि 3% GST लागतो. त्यामुळे जागतिक दरात हे कर जोडून ग्राहक दर ठरतो.
रिझर्व बँकेचे धोरण
RBI कडील चलनविषयक धोरण, व्याजदरातील बदल याचा सुद्धा अप्रत्यक्ष परिणाम सोन्याच्या (Gold Rate Today) दरावर होतो.




