आज गुरुपुष्यामृत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. म्हणूनच आज सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात लगबग असते. तसेच लग्नसराई सुद्धा सुरु झाली असल्यामुळे अनेकजण सोन्याची खरेदी या काळात करतात. तुम्ही सुद्धा आज सोन्याची खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आधी आजचे सोन्याचे दर तपासा आणि मगच खरेदी करा. आज सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. पुण्यामध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव आज काय आहेत ? जाणून घेऊया…
22 कॅरेट
आज 22 कॅरेट सोनं तुम्ही खरेदी करणार असाल किंवा 22 कॅरेट सोन्यामध्ये कोणतेही दागिने घडवणार असाल तर आज एक ग्राम साठी तुम्हाला 7145 रुपये मोजावे लागतील. आज 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 30 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 71450 रुपये इतका आहे आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांची वाढ झाली आहे.
24 कॅरेट
दुसरीकडे शुद्ध सोनं म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7795 रुपये इतका आहे. हा दर काल 7762 रुपये इतका होता. म्हणजेच आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 33 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 77 हजार 950 रुपये इतका आहे. हाच दरकाल 77,620 रुपये इतका होता म्हणजेच दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आज 330 रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीचे भाव
चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. प्रतिकिलो चांदीच्या दरात स्थिरता आहे. आज चांदी 1,01,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत चांदीची केवळ १,०१,००० रुपये दराने विक्री झाली.