संपूर्ण आठवडाभरानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही लग्नाच्या मोसमात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आज 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 10,900 रुपयांनी घसरला आहे. चला जाणून घेऊया आजचे सोन्या चांदीचे भाव
18 कॅरेट
आज प्रति 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 8200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. या स्थितीत किंमत 5,90,300 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याच वेळी, 18 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम आज 820 रुपयांनी घसरला असून भाव 59,030 रुपये झाला आहे.
22 कॅरेट
आज आठवड्याच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये चांगली घसरण झालेली दिसून येत आहे. आज 1g २२ कॅरेट सोन्याचा दर 7200 इतका आहे. हाच दर काल 7300 इतका होता. म्हणजेच आज 1 g 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे. तर दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 72 हजार रुपये आहे. हाच दर काल 73 हजार रुपये इतका होता. म्हणजेच दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरात आज घवघवीत अशी एक हजार रुपयांची घट झाली आहे
24 कॅरेट
शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 7855 इतका आहे. हाच दर काल 7964 इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 109 रुपयांची घसरण झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 78 हजार 550 रुपये इतका आहे हाच दर काल 79,640 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1090 रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीही झाली स्वस्त
आज 25 नोव्हेंबर रोजी देशभरात चांदी स्वस्त झाली आहे. अशा स्थितीत 10 ग्रॅम चांदी आज 5 रुपयांनी स्वस्त होऊन 915 रुपयांवर आली आहे. त्याचवेळी 100 ग्रॅम चांदीचा भाव आज 50 रुपयांनी घसरून 9150 रुपयांवर आला आहे. याशिवाय 1 किलोग्राम चांदी आज 25 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी स्वस्त होऊन 91,500 रुपयांवर आली आहे.