Gold Rate Today : आज अक्षय तृतीयाला स्वस्त झालं सोनं ! झटपट पहा 22,24 कॅरेटचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आवर्जून सोन्याची खरेदी भारतामध्ये केली जाते. आजच्या दिवशी सोन्याची खरेदी ही अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळेच आजच्या दिवशी सोन्याच्या खरेदीला (Gold Rate Today) मोठी गर्दी असते. चला पाहूयात आज सोनं खरेदी करायचं झालं तर तुम्हाला किती रुपये मोजावे लागतील?

आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी सोन्याचा भाव तब्बल एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम जाऊन पोहोचला होता. त्यानंतर आजपर्यंत सोन्याचा दर पुन्हा कमी झाला आहे.

22 कॅरेट (Gold Rate Today)

आज 22 कॅरेट सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर प्रति दहा ग्राम त्याचा दर 89750 इतका झाला आहे. हाच दर काल 89800 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट १० ग्राम सोन्याच्या दरामध्ये पन्नास रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट (Gold Rate Today)

तर शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 97 हजार 910 इतका आहे. हाच दरकाल 97 हजार 970 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये साठ रुपयांची घसरण झाली आहे तर एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 9791 रुपये इतका आहे.

चांदीचा भाव (Gold Rate Today)

आज दिनांक 30 एप्रिल रोजी चांदीच्या भावाबद्दल सांगायचं झाल्यास आज बुधवारी चांदी प्रति किलो एक लाख रुपयांवर पोहचली आहे. तर कालच्या तुलनेत आज अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण झाली आहे.

सोनं विकत घेताना ‘हॉलमार्क’ तपासा (Gold Rate Today)

जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.