Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालेल्या टैरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे. याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत असून, गेल्या काही दिवसांत त्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता हा काळ सोनं-चांदी खरेदीसाठी योग्य आहे का, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
काय आहे टैरिफ वॉरचं कारण?
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर आयात शुल्क (टैरिफ) लावून टैरिफ वॉरची सुरुवात केली. त्याला उत्तर म्हणून अनेक देशांनी अमेरिकेवरही प्रत्युत्तरादाखल टैरिफ लावले. या टैरिफ वॉरमुळे जागतिक आर्थिक मंदीची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटवर दबाव वाढला आहे.
सोने-चांदीचे दर का पडले? (Gold Rate Today)
या टैरिफ वॉरचा सर्वात मोठा परिणाम सोने-चांदीच्या आंतरराष्ट्रीय मागणीवर झाला आहे. सोमवारी जागतिक बाजारात सोने 3201 डॉलर प्रति औंसवरून 3060 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरले. चांदीचे दरही 35 डॉलर प्रति औंसवरून 30.40 डॉलर प्रति औंसवर आले. भारतासह जगभरातील दागदागिने बाजारात यामुळे मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
सोन्याचे आजचे भाव
सोन्याचा आजच्या दराचा विचार केला तर मुंबईमध्ये सोन्याचा आजचा भाव 24 कॅरेट दहा ग्रॅम करिता 89 हजार 730 रुपये इतका आहे. दहा ग्रॅम चा 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 82 हजार 250 रुपये (Gold Rate Today) इतका आहे.
भारतीय बाजारात घसरणीचा परिणाम
शुक्रवारी चांदीची किंमत 92,910 रुपये प्रति किलो इतकी होती. सोमवारी ती थेट 88,375 रुपये प्रति किलोवर आली – म्हणजेच साडेचार हजार रुपयांची घसरण.
हा वेळ खरेदीसाठी योग्य आहे का? (Gold Rate Today)
तज्ज्ञांच्या मते,सध्याचे दर घसरले असले तरी टैरिफ वॉर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर अजून खाली येऊ शकतात.
त्यामुळे खरेदीस थोडी प्रतीक्षा केल्यास जास्त फायदा होऊ शकतो. मात्र, दोन वर्षांपूर्वीच्या स्तरावर हे दर येण्याची शक्यता कमीच आहे. सोनं-चांदीच्या किमती सध्या घसरलेल्या असल्या तरी खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ अजून आलेला नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक बिघडल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याने, खरेदी करणाऱ्यांनी काही दिवस वाट पाहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.




