Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज ; काय आहेत आजचे दर ?

gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : आपण जाणतोच की मागच्या काही दिवसां पासून सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. तर मागच्या दोन-तीन दिवसात अगदी सोन्याचा दर हा 91 हजार प्रति दहा ग्रॅम वर जाऊन पोहोचला होता. मात्र आता सोन्याच्या दराला उतरती कळा लागली आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोन्याची किंमत घटून 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थात याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारात असलेली आर्थिक अस्थैर्य हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेल्या टॅरिफ वॉर मुळे देखील सोन्याच्या दरावर (Gold Rate Today) परिणाम झाल्याचं बोललं जात आहे आज सोन्याचा दर काय आहे ? आज सोन्याच्या दारामध्ये काय बदल झालाय पाहुयात.

24 कॅरेट (Gold Rate Today)

आजचे दर पाहायला गेले तर सोन्याच्या दरामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. काल सोन्याचा दर कमी झाला होता तर आज पुन्हा सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झालेली दिसत आहे. २४ कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 90 हजार 440 रुपये इतका आहे. हाच दरकाल 89 हजार 730 रुपये इतका होता. म्हणजेच आज सोन्याच्या दरामध्ये 710 रुपयांची वाढ झाली आहे.

22 कॅरेट (Gold Rate Today)

तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज 22 कॅरेट १० ग्राम सोन्याच्या दर 82 हजार 900 रुपये इतका आहे. हाच दरकाल 82 हजार 250 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 650 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज

इकॉनोमिक टाइम्स न दिलेल्या एका वृत्तानुसार येणाऱ्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या (Gold Rate Today) किमतीमध्ये 38 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. या वृत्तांत असं म्हटलं आहे की अमेरिकी फायनान्शिअल सर्विसेस फर्म मॉर्निंग स्टार चे ॲनालिस्ट जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमतीमध्ये 38% घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचाच अर्थ सोन्याचा दर उतरणार असून भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतामध्ये सोन्याचा भाव कमी होऊन 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर जाऊ शकतो.