Gold Rate Today : आज पुन्हा वाढला सोन्याचा भाव ; झटपट चेक करा दरऐन लग्नसराई सुरू असताना सोन्याचे वाढलेले दर हे चिंताजनक आहेत. सोन्याचे हे वाढलेले दर सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. बघूया आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर (Gold Rate Today) काय आहेत. 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज वाढ झाली की घट चला पाहूयात
24 कॅरेट (Gold Rate Today)
आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव 8787 रुपये इतका आहे. हाच दर काल 8777 रुपये इतका होता म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 87,870 रुपये इतका आहे. हाच दर काल 87,770 इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची वाढ (Gold Rate Today) झाली आहे.
22 कॅरेट (Gold Rate Today)
दुसरीकडे 22 कॅरेट सोने म्हणजेच ज्यामध्ये आपण दागिने घडवतो अशा सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर 8055 इतका आहे. हाच दर काल 8045 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम ` सोन्याचा आजचा भाव 80 हजार 550 रुपये इतका आहे हाच भाव काल 80,450 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
चांदी दर
तर आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी चांदीची किंमत प्रति किलोग्राम एक लाख चारशे रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. मागच्या काही दिवसांपासून चांदीचा दर हा काठावर म्हणजेच 90 हजारांच्या घरामध्ये होता मात्र आता आज आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी चांदीचा दर एक लाख चारशे रुपये प्रति किलोग्राम वर जाऊन पोहोचला आहे




