Gold Rate: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कझाकिस्तानमधील मोठी खाण कंपनी ‘Solid Core Resources PLC’ चे CEO वेंटली निसीस यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत (Gold Rate) अंदाज वर्तवला की पुढील 12 महिन्यांत सोन्याचा दर तब्बल 2500 अमेरिकी डॉलर्सनी घसरू शकतो.
सध्या सोन्याचा दर 3,311.45 डॉलर्स प्रति औंस (सुमारे 9110 रुपये प्रति ग्रॅम) आहे. निसीस यांच्या भाकितानुसार हा दर 2,500 डॉलर्स प्रति औंस (सुमारे 7530 रुपये प्रति ग्रॅम) इतका घसरेल, म्हणजेच प्रती ग्राम 1580 रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे. एका तोळ्यावर ही घट 15 हजार रुपयांहून अधिक होऊ शकते.
सोन्याचा दर कसा ठरवला जातो? (Gold Rate)
सोन्याचा दर हा अनेक जागतिक आर्थिक, राजकीय व औद्योगिक घटकांवर अवलंबून असतो. त्यामध्ये प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:
- जागतिक बाजारपेठेतील मागणी व पुरवठा – सोन्याच्या खाणीतील उत्पादन आणि सोन्याची औद्योगिक, गुंतवणूक किंवा दागिन्यांमध्ये वापर यावर दर अवलंबून असतो.
- डॉलरचे मूल्य – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार डॉलरमध्ये होतो. डॉलर मजबूत झाल्यास सोने महाग होते आणि त्याची मागणी कमी होते, त्यामुळे दर घसरतात.
- देशांतर्गत चलन दर व करप्रणाली – भारतात सोन्याच्या किंमती ठरवताना रुपयाचा डॉलरशी विनिमय दर, आयात शुल्क, GST, इ. गोष्टींचा समावेश होतो.
- जिओपॉलिटिकल स्थिती – युद्ध, आर्थिक मंदी, व्यापार तणाव अशा गोष्टींमुळे सोनं ‘सेफ हेव्हन’ मानलं जातं आणि दर वाढतात.
- सेंट्रल बँकांची खरेदी-विक्री – अनेक देशांच्या रिझर्व्ह बँका सोनं मोठ्या प्रमाणावर साठवतात, ज्यामुळे जागतिक दरांवर प्रभाव पडतो. सध्याच्या घडामोडींचा परिणाम (Gold Rate)
अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता, डॉलरची मजबुती आणि जागतिक आर्थिक धोरणातील बदल यामुळे सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः ट्रम्प यांनी करविषयक भूमिका सौम्य होईल असे संकेत दिले आहेत.
सध्या सोनं घेणं टाळा (Gold Rate)
सध्याच्या परिस्थितीत तज्ज्ञ सांगतात की सोनं खरेदी करण्यापूर्वी थोडी वाट पाहणं अधिक शहाणपणाचं ठरेल. किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.




