Gold Reserves : ‘या’ जिल्ह्यांत सापडली सोन्याची खाण; सरकार करणार लिलाव

Gold Reserves
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने कोणाला आवडत नाही? जगातील हा मौल्यवान धातू प्रत्येकालाचा आवडतो.. आपल्याकडे जास्तीत जास्त सोने असावं असं सर्वानाच वाटत. कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती त्याच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून असते. कागदी चलनाचे मूल्य अनेक कारणांमुळे चढ-उतार होऊ शकते.पण सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील ओडिशा राज्यात सोन्याचे साठे (Gold Reserves) सापडले आहेत. सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार आणि देवगड सारख्या जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञांना सोन्याचे मोठे साठे सापडले आहेत. लवकरच यांचा लिलाव केला जाईल, असे राज्याचे खाण मंत्री बिभूती जेना यांनी म्हटले आहे.

सरकार करणार लिलाव- Gold Reserves

यापूर्वी, आदासा-रामपल्ली येथे सोन्याचे साठे आधीच सापडले होते. यामुळे शास्रज्ञांच्या आशा वाढल्या होत्या. यामुळे आजुबाजुच्या भागात शोध सुरु करण्यात आला होता. ओडिशा सरकार देवगड जिल्ह्यात पहिल्यांदाच सोन्याच्या खाणींचा लिलाव करण्याची योजना आखत आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI), ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि राज्यातील तांत्रिक समित्यांकडून त्याचे निरीक्षण केले जात आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर, व्यावसायिक खाणकाम सुरू होऊ शकते.

भारतात सोन्याचे खाणकाम काही निवडक राज्यांमध्ये होते. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकात सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. भारतातील बहुतेक सोन्याचे उत्पादन येथून होते. कोलार गोल्ड फील्ड्स (KGF) — एकेकाळी भारतातील सर्वात प्रसिद्ध सोन्याची खाण, आता बंद आहे. हुट्टी सोन्याची खाण — अजूनही सक्रिय आहे आणि भारतातील सर्वात मोठी सक्रिय सोन्याची खाण आहे. रायचूर आणि बेल्लारी जिल्हे देखील प्रमुख खाण क्षेत्र आहेत.

आंध्र प्रदेश – रामगिरी गोल्ड फील्ड (अनंतपूर जिल्हा) येथे सोन्याच्या खाणी आहेत. येथे खाणकाम कमी प्रमाणात केले जाते परंतु हळूहळू विकसित होत आहे.

झारखंड – पलामू आणि रांची जिल्ह्यांमध्ये सोन्याचे अवशेष सापडले आहेत. काही भागात खाणकामाच्या शक्यतेवर संशोधन सुरू आहे.

छत्तीसगड – सोनाक्ष परिसर आणि बालोद जिल्ह्यात सोन्याचे अस्तित्व आढळून आले आहे. भविष्यात येथे खाणकाम करण्याचे नियोजन आहे.

ओडिशा हेनवीन उदयोन्मुख सोन्याचे केंद्र बनले आहे. अलीकडेच अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन सोन्याचे साठे सापडले आहेत, जसे की:- देवगड, संबलपूर, सुनगड, नबरंगपूर. ओडिशा सरकार पहिल्यांदाच सोन्याच्या खाणींचा लिलाव करण्याची योजना आखत आहे.

केरळ- प्लेसर गोल्ड (वाळूमध्ये आढळणारे सोने) काही नद्यांमध्ये (जसे की पेरियार) आढळते.