धुळे : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरटयांनी सोन्याचे दागिने केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी : शहरातील चाळीसगाव रोड जवळील कॉलनीतील घरात घुसून भरदिवसा दोन तोळे सोन्यांचे दागिने लंपास केले आहेत . पितळ , चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असा बहाणा करून या चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि हातचलाखीने दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत .

या घटनेविषयी सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार , चाळीसगाव रोड पश्चिम हुडको मागील बाजुस असलेल्या जिजाई कॉलनीतील प्लॉट नं.34.रा.मिनाक्षी शंकर विभुते यांच्या घरात दोन अज्ञात व्यक्ती आल्या. त्यांनी तांब्याच्या भांड्याला व एका चांदाचे भांडीला पॉलीश करुन दाखविले.आणि विश्वास संपादन केला व विभुते यांना गळ्यातील सोन्यांची मंगलपोत काढा.कानातले काढा ते पॉलीश करुन देतो असे सांगितले . एक भांडे आणा असे सांगितले , त्यात हळद ,पाणी टाकले व यात मंगलपोत व कानातले टाकले आहे. थोड्या वेळानी काढुन घ्या सांगत ते पळुन गेले.

नंतर महिलेत्या लक्षात आले की , दोन तोळे सोने चोरीस गेले आहे. परिसरात हि माहिती समजताच एकच गोंधळ उडाला . काहीनी या चोरट्याना पाहिले असल्याचे सांगितले . चोरी बाबत पोलीसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . चोरटे ज्या मार्गाने गेले त्या भागातील सिसीटिव्ही फुटेज तपासणी करुन चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.वाढत्या चोऱ्या पोलीसांच्या डोकेदुखी ठरत आहे.चोरी सञ सुर असल्याने नागरीकांत रोषाचे वातारण आहे.

अशा घटना आज पर्यंत अनेक वेळा घडलेल्या आहेत . महिला घरात एकट्या असल्याचा अंदाज घेऊन किंवा पळत ठेऊन घरात काही कारणाने प्रवेश मिळवला जातो आणि हातचलाखीने दागिने लंपास केले जातात . धुळ्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महिला वर्गाने घरी एकटे असताना सावध राहणे आवश्यक आहे हे अधोरेखित होते . विशेष करून तुमच्या अंगावरील दागिने महागाच्या वस्तूंविषयी अज्ञात व्यक्तीला माहिती देऊ नका , कोणत्याही कारणाने चीजवस्तू कोणाच्या ताब्यात देऊ नका . एव्हाना अशा लोकांना घरात प्रवेश देखील देऊ नका .

Leave a Comment