भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; या तारखेच्या आत करावा लागेल अर्ज

0
1
Indian Navy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मध्ये एकूण २७० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी येत्या २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. या भरती प्रक्रियेमुळे नौदलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती प्रक्रिया आणि पात्रता

भारतीय नौदल जानेवारी २०२६ च्या अभ्यासक्रमाकरिता शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्ससाठी अर्ज मागवत आहे. यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांनी संबंधित शाखेत किमान ६० टक्के गुणांसह BE किंवा B.Tech केलेले असणे आवश्यक आहे. जनरल सर्व्हिस, पायलट, नेव्हल ऑपरेशन्स ऑफिसर आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.

परंतु लॉजिस्टिक्ससाठी MBA असणे अनिवार्य आहे. तर शिक्षण शाखेसाठी M.Tech किंवा MSc आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचा जन्म जानेवारी २००१ ते जुलै २००६ दरम्यान झालेला असावा.

अर्ज कसा करावा?

१. प्रथम joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. नंतर ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा.
३. येथे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
५. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड पदवीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांना पुढे SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर, वैद्यकीय चाचणी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड होईल.

कोणत्या शाखांसाठी भरती?

१. कार्यकारी शाखा –
सामान्य सेवा
पायलट
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर
एअर ट्रॅफिक कंट्रोलर
लॉजिस्टिक्स
नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट

२. शिक्षण शाखा

३. तांत्रिक शाखा –
अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा)
इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा)
नौदल कन्स्ट्रक्टर

अर्जाची अंतिम तारीख

या भरती अंतर्गत अर्ज करण्याचे अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 अशी आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न वाया घालवतात त्वरित आपापले अर्ज जमा करावेत. तसेच आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.