पुणेकरांसाठी आयआरसीटीसीने (IRCTC) एक जबरदस्त ट्रिप प्लॅन केली आहे, जी तुम्हाला उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना एकाच वेळी भेट देण्याची संधी देणार आहे. ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ ही विशेष टूरिस्ट ट्रेन पुण्यातून 17 एप्रिल रोजी रवाना होणार असून, 10 दिवसांची ही यात्रा 5,000 किमीहून अधिक अंतर पार करून पुन्हा पुण्यात परत येणार आहे.
या विशेष ट्रिपमध्ये खालील स्थळांना भेट दिली जाणार आहे
- हरिद्वार आणि हृषीकेश – हर की पौडी, गंगा आरती
- अमृतसर – सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर
- कटरा – माता वैष्णोदेवीचे दर्शन
- मथुरा-वृंदावन – श्रीकृष्ण जन्मभूमी आणि प्रमुख मंदिरे
- आग्रा – जगप्रसिद्ध ताजमहाल
प्रवेश स्थानकं
ही ट्रेन खालील स्थानकांहून उपलब्ध आहे
- पुणे
- लोणावळा
- कर्जत
- कल्याण
- वसई रोड
- वापी
- सूरत
- बडोदा
आरक्षण ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित असून, एकूण 750 आसनांची क्षमता आहे.
तिकीट दर (प्रति प्रवासी)
- स्लीपर क्लास (शयनयान): ₹18,230
- 3AC (तृतीय श्रेणी वातानुकूलित): ₹33,880
- 2AC (द्वितीय श्रेणी वातानुकूलित): ₹41,530
प्रवाशांसाठी सुविधा
- वातानुकूलित रेल्वे डबे आणि निवास व्यवस्था
- शाकाहारी भोजन: चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण
- पर्यटनस्थळी AC बसने प्रवास
- प्रत्येक स्थळी अनुभवी मार्गदर्शक
- संपूर्ण ट्रिपदरम्यान सुरक्षित आणि नियोजित व्यवस्था
‘देखो अपना देश’ उपक्रमांतर्गत खास योजना
ही ट्रिप केंद्र सरकारच्या ‘भारत गौरव रेल्वे योजना’ अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. याआधीही देशभरातून अनेक अशा विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत आणि प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.
ट्रिप प्लॅन करताय?
तर ही टूर आहे एकदम परफेक्ट! धार्मिक स्थळं, ऐतिहासिक स्मारकं, आरामदायक रेल्वे प्रवास आणि उत्तम व्यवस्था हे सर्व एका पॅकेजमध्ये!
अधिक माहितीसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा नजीकच्या पर्यटन कार्यालयात चौकशी करा.




