Good Cibil Score | आजकाल अनेक लोक कर्ज काढत असतात. परंतु ते कर्ज काढताना त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळेल याचा विचार करत असतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2022 पासून रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचे व्याजदर देखील उच्च पातळी वर गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लोक आहेत ते कर्ज घेताना असे पर्याय शोधत आहे. ज्यामध्ये त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल. परंतु तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे खूप गरजेचे आहे. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगला सिबिल स्कोर असलेल्या लोकांसाठी गृह कर्जावर सूट देत आहे.
परंतु अजून असे अनेक लोक आहेत त्यांना सिबिल स्कोर म्हणजे काय ते माहीत नाही. त्याचप्रमाणे या सिबिल स्कोरचा काय उपयोग होतो. काय परिणाम होतात हे देखील माहीत नसते. सिबिल स्कोर हा त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर असतो. हा क्रेडिट स्कोर नेहमी 300 ते 900 यामध्ये मोजला जातो. सिबील स्कोर जितका चांगला असतो त्याचा फायदा आपल्याला होत असतो.
साधारणपणे एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असला तर तो चांगला मानला जातो. आणि त्या व्यक्तीला कर्ज मिळण्याची शक्यता देखील जास्त असते. आपला बँकेचा संपूर्ण इतिहास दर्शवतो. त्याचप्रमाणे तुम्ही कर्ज घेताना कोणती चूक केलेली आहे हे देखील सिबील स्कोरमध्ये कळते.
कोणता सिबिल स्कोर किती टक्के चांगला आहे हे पाहूया
- 550 ते 649 हा स्कोर 9.65 टक्के दराने कर्ज मिळते.
- 650 ते 699 सिबिल स्कोर जर तुमचा सिबिल स्कोर हा असेल तर यावर तुम्हाला 9.45% दराने कर्ज मिळते.
- 700 ते 749 यावर तुम्हाला 9.35% दराने कर्ज मिळते.
- 750 ते 800 यावर तुम्हाला बँक 9.15% दराने गृह कर्ज देते.
सिबिल स्कोर ऑनलाईन कसा तपासायचा | Good Cibil Score
- यासाठी तुम्हाला सिबीलच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- त्यानंतर तुम्ही सिबिल स्कोर हा ऑप्शन निवडा.
- त्यानंतर वार्षिक सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी तेथे क्लिक करा
- त्यानंतर तुमचे नाव ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाईप करा.
- त्याचप्रमाणे तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजेच पासपोर्ट क्रमांक , पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, यासारख्या गोष्टी जोडा त्यानंतर तुमचा पिन कोड जन्मतारीख आणि तुमचा फोन नंबर टाका.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाईप करा आणि सुरू ठेवा.
- त्यानंतर डॅशबोर्ड वर जा आणि तुमचा क्रेडिट स्कोर तपासा.