Good Friday 2024 | आज म्हणजेच 29 मार्च रोजी सर्वत्र गुड फ्रायडे (Good Friday 2024) साजरा होत आहे. हा सण ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. ख्रिश्चन धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशीच प्रभू येशू ख्रिस्त यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो. ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आता आपण या गुड फ्रायडे (Good Friday 2024) दिवसाचे महत्त्व काय आहे? हा सण साजरा केला जातो? त्याचप्रमाणे त्या दिवशी लोक कोणता आहार करतात? या सगळ्याची माहिती पाहणार आहोत.
गुड फ्रायडे का साजरा केला जातो ?
ख्रिश्चन धर्माचे प्रमुख येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून दरवर्षी गुड फ्रायडे हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी ईस्टरच्या आधी म्हणजेच शुक्रवारी येतो. मानवतेच्या कल्याणासाठी येशू ख्रिस्ताने त्यांच्या इच्छेने प्राण्यांची अहोती दिली होती. त्यामुळे याच दिवसाला ब्लॅक फ्रायडे किंवा होली फ्रायडे असे देखील म्हणतात.
अनेक लोक हे गुड फ्रायडेच्या आधी उपवास देखील करतात. त्याबाबत काही नियम देखील आहे. या नियमांमध्ये मांसाहार करण्यात फक्त मासे खाण्याचा नियम आहे. उपवासाच्या या दिवसांना ख्रिश्चनमध्ये लेंट असे म्हणतात. तो 40 दिवस असते. यामध्ये सगळे लोक उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. परंतु या उपवासात त्यांना फक्त मासे खावे लागतात आणि त्यामागे अनेक कारणे आहेत.
गुड फ्रायडेला मासे का खातात ? | Good Friday 2024
गुड फ्रायडेला मासे खाण्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या काळी मासे अगदी सहज आणि स्वस्त दरात मिळायचे. आणि विशेष खाद्यपदार्थांमध्ये त्याचा समावेश आला नाही त्यामुळे. त्यामुळे अनेकजण मासे खातात कारण गुड फ्रायडेच्या दिवशी इतर माणूस खाण्यास मनाई असते. त्यामुळे जास्त लोक मासे खातात. या दिवशी उपवास सोडल्यानंतर लोक हे फळे भाज्या धान्य दूध इत्यादी पदार्थ खातात आणि दिवसभर उपवासात केवळ मासे खातात.
गुड फ्रायडेच्या दिवशी मासे खाण्याचे अजून एक कारण आहे. ते म्हणजे येशू ख्रिस्त यांचे अनेक अनुयायी मच्छीमार होते. जेव्हा ख्रिश्चन धर्मावर बंदी घालण्यात आली तेव्हा त्यांच्या धर्मातील लोकांना ओळखण्यासाठी मासे वापरण्यात आले. त्यामुळे या दिवशी देखील मासे खाण्याला खूप महत्त्व आहे.
गुड फ्रायडेला आणखी काय खातात?
गुड फ्रायडेच्या दिवशीहॉट क्रॉस बन्स देखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. त्याचप्रमाणे अंडी, कोळंबी आणि सामुद्रिक खाद्यपदार्थ त्यांच्यापासून बनवलेल्या भाज्या देखील गुड फ्रायडेच्या दिवशी खातात.