नवी दिल्ली | जिओच्या आगमनाने मोबाईल सिमकार्ड कंपन्यांना चांगलेच शर्यतीत पळवले आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. BSNL च्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायता येत होता. मात्र, नवीन प्लाननुसार तब्बल 5 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.याचाच एक अर्थ असा होतो कि पूर्वी पेक्षा 25 पट अधिक जास्त डेटा ग्राहकांना दररोज मिळणार आहे.
BSNLकंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे प्लानची वैधता ही 5 दिवसांचीच असणार आहे. त्यामुळे 35 रुपयांत 5 जीबी डेटा म्हणजेच दररोज एक जीबी डेटा ग्राहकाला वापरता येईल.
याच बरोबर BSNL कडून नवे प्लान देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, 53 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्येही कंपनीने बदल केला असून या प्लाननुसार आता 250 एमबी डेटाऐवजी युजर्सना तब्बल 8 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र, या प्लानची वैधता 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असणार आहे. तसेच 395 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई व दिल्ली वगळता) मिळेल. त्याच प्रमाणे जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता 71 दिवसांची आहे.