क्रिकेटप्रेमींसाठी गूड न्युज !! आयपीएलच्या धर्तीवर अजून एका T-20 क्रिकेट स्पर्धेची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर ठेवनारी भारतातील आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा जगभर गाजली. क्रिकेट च्या छोट्या सामन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन झाले. त्यामुळे आयपीएलच्या धर्तीवर जगभरातील अनेक देशांनी अशा स्पर्धांचे आयोजन केलं. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज मध्ये असा स्पर्धाना भरगोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आयपीएलच्या धर्तीवर इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आता आपली स्वत:ची टी-ट्वेन्टी सुरु करण्याची घोषणा केली आहे.

इमिरेट्सची क्रिकेट लीग कधी?

इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की टी -20 लीगचा पहिला हंगाम यावर्षी होणार आहे. लीगचे आयोजन डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत केले जाईल. या लीगला इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नहयान मुबारक अल नहयान यांचंही समर्थन आहे. यूएईने याअगोदरही स्थानिक पातळीवर टी-20 क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं आहे.

यूएईच्या टी 20 लीगमध्ये 6 टीम

आयपीएलच्या धर्तीवर फ्रँचायजीकडूनच खेळाडूंची बोली लागेल. या स्पर्धेत क्रिकेट जगतातले अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत सहा टीम खेळतील. या सहा टीमच्या फ्रेंजायजीबद्दल तसंच या पुढची माहिती लवकरात लवकर जाहीर करु, असं इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने  म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like