Sunday, May 28, 2023

BoB ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने कमी केले व्याज दर; आता तुमचा EMI कमी होणार

नवी दिल्ली । देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक BoB (Bank Of Baroda) ने आपल्या ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने रेपो लिंक्ड लोन रेट मध्ये 10 बेसिस पॉईंट किंवा 0.10 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर BRLLR हा 6.85 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजपासून बँकेचे नवीन दर अंमलात आले आहेत. म्हणजेच ग्राहकांना आजपासून स्वस्त कर्ज मिळेल. व्याजदरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना ऑटो लोन, होम लोन आणि पर्सनल लोन वर कमी व्याज दर द्यावे लागतील.

बँकेने केलेल्या या कपातीचा फायदा होम लोन (Home Loan), मॉर्गेज लोन (Mortgage Loan), कार लोन (Car Loan), एज्युकेशन लोन (Education Loan), पर्सनल लोन (Personal Loan) आणि इतर सर्व प्रकारचे लोन घेणाऱ्यांना होणार आहेत.

व्याज दर किती असेल ?
बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कपातीनंतर होम लोनवरील व्याज दर 6.75 टक्के असतील. याशिवाय ऑटो लोनवर 7 टक्के टॅक्स असणार आहे. त्याच वेळी, दुसर्‍या मॉर्गेज लोनवर 7.95% आणि एज्युकेशन लोनवर 6.75% असेल.

एसबीआयचे दर तपासा
एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांनीही आपल्या व्याज दरात कपात केली आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियानेही होम लोनवरील व्याज दरात कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सिबिल स्कोअरवर आधारित होम लोनवरील सुमारे 0.1 टक्के सवलत जाहीर केली आहे. यासह एसबीआयचे होम लोन 6.70 च्या किमान व्याजदराचे झाले आहे.

एचडीएफसीने व्याज दर किती कमी केले आहेत?
एचडीएफसीने देखील आपल्या होम लोनवरील व्याज दरात नुकतीच कपात करण्याची घोषणा केली. एचडीएफसीने होम लोनवरील व्याज दरात 5 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.05 टक्के कपात केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कपातीनंतर चांगली लोन हिस्ट्री असणार्‍या ‘सर्वोत्कृष्ट ग्राहकांना’ होम लोन 6.75 टक्के व्याजदराने मिळेल.

आयसीआयसीआय बँक चेक दर
आयसीआयसीआय बँकेने होम लोनवरील व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत. गेल्या दहा वर्षात बँकेचा हा सर्वात स्वस्त होम लोन रेट आहे. हा लोन रेट आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून अंमलात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.