मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशन भारतीय बाजारात लवकरच नवा गेम लाँच करणार आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही. भारतात हा गेम PUBG Mobile India या नावाने लाँच केला जाणार आहे.
PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरुक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार करणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.
Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशन त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स करणार आहे.
भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज केला जाणार आहे.PUBG Mobile India हा गेम कधी लाँच होणार, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीकडून एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, त्यात म्हटलं आहे की, आम्ही गेमच्या लाँचिंगबाबत लवकरच माहिती जाहीर करु.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in