नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) कोरोना आणि लॉकडाऊन पाहता आपल्या ग्राहकांना बर्याच सुविधा देत आहे. त्यांनी 50 हून अधिक शहरांमध्ये मोबाइल एटीएम (Mobile ATM) सुरू केले आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि निर्बंधांदरम्यान लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेच्या या सुविधेमुळे सामान्य नागरिकांना कॅश काढण्यासाठी आपल्या क्षेत्राबाहेर जाण्याची गरज भासणार नाही.
मोबाइल ATM मधून 15 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवहार करता येतात
या माध्यमातून लोकं घराजवळ पोहोचणार्या मोबाइल ATM व्हॅनमधून कॅश (Cash Withdrawal) काढू शकतील. याद्वारे ग्राहक 15 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवहार करू शकतील. मोबाइल एटीएम सर्व ठिकाणी ठराविक वेळी उपलब्ध असतील आणि दिवसातून 3 ते 4 ठिकाणी त्यांची सेवा पुरवतील.
एचडीएफसी बँकेच्या मोबाइल एटीएम सेवेद्वारे (Mobile ATM Service) ग्राहक कॅश काढणे, एटीएम पिन नंबर बदलणे, प्रीपेड मोबाइल रिचार्ज करणे, वीज किंवा अन्य युटिलिटी बिले भरणे यासह 15 प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
या शहरांमध्ये मोबाइल एटीएम सुरू झाले
एचडीएफसी बँकेने मोबाइल एटीएम सुरू केलेल्या शहरांमध्ये मुंबई, सालेम, पुणे, देहरादून, चेन्नई, लखनऊ, होसूर, लुधियाना, त्रिची, चंडीगड, हैदराबाद, कटक, अहमदाबाद, भुवनेश्वर, दिल्ली, विजयवाडा, त्रिवेंद्रम, तिरुवनंतपुरम, गुरगाव, कोयंबटूर आणि अलाहाबाद यांचा समावेश आहे. .
‘या’ छोट्या शहरांनाही मिळतील सुविधा
बँकेने म्हटले आहे की,” जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पुदुचेरी, विझाग, राजामंड्री, मदुराई इत्यादी छोट्या शहरांमध्ये मोबाइल एटीएम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा