नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता वाढू शकते रिटायरमेंटचे वय आणि पेन्शनची रक्कम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नोकरी करणाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी मिळू शकते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC) असे सुचवले आहे की,” देशातील लोकांची कामकाजाची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. रिटायरमेंटचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी.”

EAC नुसार, या अंतर्गत, दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन म्हणून दिले जावेत. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याची बाजू मांडली आहे.

32 कोटी ज्येष्ठ नागरिक होतील
जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. हे देशाच्या लोकसंख्येच्या 19.5 टक्के असेल. 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के किंवा 14 कोटी लोकं ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

कौशल्य विकासावर भर
केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत, ज्यामुळे कौशल्य विकासावर अधिक भर देता येईल, असे या रिपोर्टमध्ये सुचवण्यात आले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणाऱ्या सर्व लोकांचाही समावेश करावा.

Leave a Comment