16 लाख नोकऱ्या, 54 सामंजस्य करार…; दावोसमधून महाराष्ट्राला खुशखबर

0
8
Memorandum of Understanding
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने एक ऐतिहासिक कार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या 54 सामंजस्य करारांवर (Memorandum of Understanding) सही केली आहे. यामुळे 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. या करारामुळे बेरोजगारी कमी होईल, तसेच राज्यातील आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल . या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार –

या करारांमध्ये रिलायन्स समूहाने 3.05 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स आणि औद्योगिक क्षेत्रविकास यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या करारामुळे 3 लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. तसेच, अ‍ॅमेझॉनने 71,795 कोटी रुपये गुंतवून एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सची निर्मिती केली जाईल, ज्यामुळे 83,100 रोजगार निर्माण होणार आहेत.

विविध सामंजस्य करार –

सिएट कंपनीने नागपूरमध्ये ऑटोमोबाईल इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) क्षेत्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे 500 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

व्हीआयटी सेमिकॉन्स कंपनीने रत्नागिरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 24,437 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा ठराव केला आहे. या प्रकल्पामुळे 33,600 नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील.

टाटा समूहाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीद्वारे विविध उद्योगांमध्ये प्रगती साधली जाईल, ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

रुरल एन्हान्सर्स कंपनीने रुग्णालयादी आणि सामाजिक क्षेत्रात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

पॉवरिन ऊर्जा कंपनीने हरित ऊर्जा क्षेत्रात 15,299 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 4,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज कंपनीने हरित ऊर्जा क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,000 नवीन रोजगार संधी निर्माण होतील.

युनायटेड फॉस्परस लि. कंपनीने हरित ऊर्जा क्षेत्रात 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,300 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

ईरुलर्निंग सोल्युशन्स कंपनीने शिक्षण क्षेत्रात 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 20,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

ऑलेक्ट्रा ईव्ही कंपनीने ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,000 नवीन रोजगार संधी निर्माण होतील.

फ्युएल कंपनीने पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटी मनोदय करून राज्यातील 5,000 युवकांना एआय, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स यासारख्या अत्याधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रकल्पात एकूण 6,25,457 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि 1,53,635 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ने विविध क्षेत्रांमध्ये, जसे की पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट, 3,05,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे 3,00,000 नवीन रोजगार संधी निर्माण होतील.

ग्रिटा एनर्जी कंपनीने चंद्रपूरमध्ये स्टील आणि मेटल्स क्षेत्रात 10,319 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 3,200 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

वर्धान लिथियम कंपनीने नागपूरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात लिथियम रिफायनरी आणि लिथियम बॅटरी उत्पादनासाठी 42,535 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 5,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

इंडोरामा कंपनीने रायगडमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

इंडोरामा कंपनीने रायगडमध्ये टेक्निकल टेक्सटाईल्स क्षेत्रात 10,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 3,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

सॉटेफिन भारत कंपनीने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये 8,641 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित होऊन क्षेत्रीय विकासास गती मिळेल.

ब्लॅकस्टोन कंपनीने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये 43,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास होईल.

सिलॉन बिव्हरेज कंपनीने अहिल्यानगरमध्ये अन्न आणि पेये क्षेत्रात 1,039 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 450 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

लासर्न अँड टुब्रो लि. ने तळेगावमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 2,500 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

नेल्सन मिडिया प्रा. लि. कंपनीने एमएमआर क्षेत्रात आयटी क्षेत्रात 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,100 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

इकॉनॉमि एक्सप्लोझिव्हज लि. ने नागपूरमध्ये अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रात 12,780 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 2,325 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

एमएसएन होल्डिंग्ज लि. ने नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात 14,652 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 8,760 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

प्रियम सोल्युशन्स प्रा. लि. ने जालना मध्ये ड्रोननिर्मिती क्षेत्रात 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 300 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स कंपनीने विदर्भ, मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रातील हरित ऊर्जा क्षेत्रात 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,300 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

हॅझेरो इंडस्ट्रीज कंपनीने बुटीबोरी मध्ये हरित ऊर्जा क्षेत्रात 16,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीत दोन प्रकल्प असतील, ज्यामुळे 10,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

टॉरल इंडिया कंपनीने अहिल्यानगरमध्ये अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स क्षेत्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 1,200 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट कंपनीने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये 43,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरानंदानी समूहाने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये 51,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे

एव्हरस्टोन समूहाने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये 8,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रॉसरेल इंटरनॅशनलने एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे एमएमआरमध्ये वाहतूक सुविधांच्या विकासात मोठा बदल घडवून आणला जाईल.

रोजगार संधी निर्माण होणार –

संपूर्ण दावोस सामंजस्य करारांमध्ये एकूण 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे, ज्यामुळे 15.75 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. हे प्रकल्प राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये विकासाला गती देण्यास मदत करतील.