PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 30 सप्टेंबरपर्यंत होम लोनवर प्रोसेसिंग फीस आणि डॉक्युमेंटेशन चार्ज आकारले जाणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 75 व्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राहकांकडून होम लोन वरील प्रोसेसिंग फीस आणि डॉक्युमेंटेशन चार्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत होम लोन वर प्रोसेसिंग फीस आणि डॉक्युमेंटेशन चार्ज भरावे लागणार नाही.

PNB 6.80% दराने होम लोन देत आहे
पूर्वी, PNB होम लोनच्या 0.50 टक्के प्रोसेसिंग फीस आणि डॉक्युमेंटेशन चार्ज म्हणून आकारत असे. पण आता ते पूर्णपणे मोफत असेल. PNB आपल्या ग्राहकांना 6.80% दराने होम लोन देत आहे. जेव्हा एखादी बँक होम लोन देते, तेव्हा ग्राहकाला त्यासाठी प्रोसेसिंग फीस भरावे लागते आणि ते फक्त एकदाच दिले जाते.

SBI ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रिटेल ग्राहकांसाठी रिटेल लोन आणि डिपॉझिट्सवर अनेक ऑफर्सचा पाऊस पाडला आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना होम लोन वरील प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. या व्यतिरिक्त, बँकेने सर्व चॅनेल्सवरील कार लोन ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फीसवर 100% सूट जाहीर केली आहे. ग्राहक त्यांच्या कार लोनच्या 90% पर्यंत ऑन-रोड फायनान्सिंगची सुविधा घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, SBI इतर सवलतीच्या व्याज दरासह बाहेर आले.

Leave a Comment