SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI च्या सवलतीनंतर आता बँक लवकरच सुरू करेल ‘हि’ नवीन योजना, जाणून घ्या

मुंबई । भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या सर्व रिटेल लोनचे रिस्‍ट्रक्‍चरिंग करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. इंग्लिश बिझिनेस वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, या पोर्टलच्या माध्यमातून आता ग्राहक आपल्या लोनच्या रिस्‍ट्रक्‍चरिंगसाठी अर्ज करू शकतील. यामध्ये रिस्‍ट्रक्‍चरिंग साठी पात्रतादेखील पाहिली जाऊ शकते. हे पोर्टल 24 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

यामध्ये सूचना दिल्या जातील. ग्राहक यास पात्र आहेत की नाही हे त्यांना समजेल. हा कालावधी 6 महिने ते 2 वर्षांचा असू शकतो. SBI च्या ग्राहकांची संख्या ही दोन कोटी आहे. ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. मात्र, बँक कॉर्पोरेट आणि एमएसएमई ग्राहकांकडून शाखांमधील लोन रीस्‍ट्रक्‍चरिंग अर्ज स्वीकारत राहील.

SBI अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले,”आमच्याकडे 30 लाख गृहकर्ज ग्राहक आहेत. जर एखाद्यास आपली पात्रता तपासण्याची इच्छा असेल तर ती पूर्णपणे ऑटोमॅटिकली होईल. आम्ही ही प्रक्रिया मॅन्युअली करू शकत नाही.” ते म्हणाले,” ही सिस्‍टम येत्या काही महिन्यांत आपले सध्याचे उत्पन्न आणि अपेक्षित उत्पन्न याची तपासणी करेल. यावर आधारित ते 12 महिन्यांपासून दोन वर्षापर्यंतचे मोरेटोरियम सुचवेल. 22-24 सप्टेंबरपासून सुरुवात करण्याची आमची योजना आहे.”

या रिस्‍ट्रक्‍चरिंगमध्ये कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा वाढविला जाऊ शकतो. याशिवाय बँका काही निर्धारित अटींनुसार व्याज देयतेची वारंवारता देखील बदलू शकतात. हे प्रत्येक बाबतीत वेगवेगळे असू शकते. रिस्‍ट्रक्‍चरिंग पर्याय अगदी शेवटी निवडला जातो. जेव्हा कर्जदाराच्या बाजूने डीफॉल्टचा धोका असतो तेव्हा हे केले जाते. कोरोना साथीने बर्‍याच लोकांसमोर अशाच परिस्थिती निर्माण केलेल्या आहेत. यामुळे लोकांच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.

जून अखेरीस बँकेच्या लोन बुकचा दहावा भाग मोरेटोरियमच्या खाली होता. मेच्या तुलनेत त्यात 21.8 टक्के घट झाली आहे. रिटेल सेगमेंटमध्ये जवळपास 90 लाख ग्राहकांनी मोरेटोरियम घेतला आहे. यात साडेसहा लाख कोटी रुपयांची रक्कम जोडली गेली आहे. बँकिंग क्षेत्राचा मागोवा घेणार्‍या विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, रीस्‍ट्रक्‍चरिंगसाठी बरीच मागणी येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like