SBI ग्राहकांसाठी गुड न्युज ! आता घरात बसून करता येणार ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना अपडेट राहण्यासाठी नेहमी नवीन सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने नुकतेच ग्राहकांना हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विट द्वारे सर्व ग्राहकांना सूचना दिल्या होत्या. आता बँकेने ग्राहकांच्या ओळखीसाठी ऑनलाईन व्हिडीओ केवायसी ची सुरुवात केली आहे. बँकेने सांगितले की, एसबीआय कार्डची वेगाने सुरुवात केलीआहे. ही सर्विस अँड टू अँड पेपरलेस, डिजिटल सोर्सिंग आणि दुसऱ्या कामांसाठी सोपे बनवण्यासाठी हा प्रयत्न आहे.

हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यासाठीच्या काही खास सूचना सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI यांनी आपल्या ग्राहकांची ओळख व्हावी यासाठी व्हिडिओ KYC (know your customer) ची सुरुवात केली आहे.व्हिडिओ केवायसी साठी जिओ टॅगिंग, फेशियल रिकन्गनिश या सारखी अन्य टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना झीरो कॉन्टॅक्ट आणि कुठल्याही अडचणी शिवाय बँक फॅसिलिटी देता यावी म्हणून हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. केवायसीवरून बँक संबंधित फ्रॉड ला मोठ्या प्रमाणात रोखता येवू शकते. तसेच ही केवायसीची प्रक्रियेत लागणारी रक्कम ही अर्धी करण्यास मदत करता येवू शकते. असे बँकेने म्हंटले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक सुचीनुसार, व्हिडिओ केवायसी साठी फेशियल रिकॉग्निशन, डायनामिक व्हेरिफिकेशन कोड, लाइव्ह फोटो कॅप्चर आणि जिओ टॅगिंग या सारखी तांत्रिक बाबींचा वापर केला जातो. व्हिडिओ केवायसी साठी ग्राहकांना बँकेंतून अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक एक लिंक ग्राहकांना पाठवते. यात ग्राहकांचे नाव, पॅन नंबर आणि आधार कार्डची माहिती याचा समावेश असतो. ही सर्व माहिती एन्टर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जाते. बँकेला सर्व माहिती दिल्यानंतर ग्राहकांना डायनामिक व्हेरिफिकेशन कोड वरून एसबीआय बँक एक एसबीआय कार्ड ऑफिसरकडून एक व्हिडिओ कॉल कनेक्ट केला जातो.

ग्राहकांच्या व्हेरिफिकेशनसाठी AI इनेबल्ड OCR वरून पॅन कार्ड दाखवावे लागते. व्हिडिओ कॉल वेळी बँक अधिकारी अर्ज करणाऱ्या ग्राहकांचा फोटो क्लिक करतो. त्याचा वापर फेशियल रिकॉग्निशन सॉफ्टवेअर वरुन आधार कार्ड आणि पॅन कार्ड चा फोटो पडताळून पाहता येते. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते.एसबीआय बँकेचा ग्राहक भारतात आहे की नाही, हे तपासण्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर केला जातो. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तसेच व्हिडिओ केवायसीची प्रक्रिया झाल्यानंतर बँक अधिकारी पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पाहतो. एप्लिकेशन अर्जला डिजिटल साईन करण्यासाठी ई -साईन प्रक्रियेचा वापर केला जातो. स्टेट बँक ऑफ इंडियाचे तुम्ही बँक खातेदार असाल तर तुम्ही ही सर्व प्रक्रिया घरी बसून ऑनालईन करु शकता. तुम्हाला यासाठी बँकेत येण्याची गरज आता भासणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment