औरंगाबाद | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचे गुणपत्रक 9 ऑगस्ट पासून वाटप करण्यात येणार आहे. अशा माहितीचे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे.
मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना नियोजित केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक घ्यावे लागणार आहेत. शहरी भागातील प्रमाणपत्र आणि गुणपत्रके शिशु विकास मंदिर शाळेत सकाळी 11 ते 3 या वेळेत वितरित करण्यात येणार आहेत.
तर ग्रामीण भागासाठी विभागीय मंडळ कार्यालयातून सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 1 ते 3 या वेळेत वितरण केले जाणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका व प्रमाणपत्र घेऊन जावे असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.