अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, एप्रिल ते जून ‘या’ तिमाहीत भारताने नोंदवला निर्यातीचा विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसची दुसरी लाट मंदावल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परत येत असल्याचे दिसते आहे. इंजीनिअरिंग, तांदूळ, ऑईल मील आणि सागरी उत्पादनांसह विविध क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली. ज्यामुळे चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या निर्यातीत 95 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की,”आर्थिक वर्ष 2018-19 च्या एप्रिल ते जून या तिमाहीत वस्तूंची निर्यात 82 अब्ज डॉलर्स होती. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात 51 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्याच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत निर्यात 90 अब्ज डॉलर्स इतकी होती. गेल्या महिन्यात देशाची निर्यात 47 टक्क्यांनी वाढून 32 अब्ज डॉलर्स वर गेली.

एप्रिल ते जून 2021 च्या पहिल्या तिमाहीत भारताने नोंदवला निर्यातीचा विक्रम
“यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील वस्तूंची निर्यात ही कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक आहे,” असे गोयल म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment