चांगली बातमी ! जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८५.९१ टक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जळगांव जिल्हयात देखील प्रचंड प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अनेक जवळच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. पण कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या ९४ हजार ७८२ रुग्णांपैकी ८१ हजार ४२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात ११ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यावरून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९१ टक्के असल्याचे समोर आले आहे, तर मृत्युदर १.७९ टक्के इतका खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साळळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या संशयितांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ११ हजार ६५६ रुग्णांपैकी ९ हजार १८ रुग्ण लक्षणे नसलेले तर २ हजार ६३८ रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like