खुशखबर ! Paytm देणार 50 कोटींचे कॅशबॅक, ‘हा’ निर्णय का घेण्यात आला आणि याचा फायदा कोणाला मिळणार ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) ने आपला IPO आणण्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅपद्वारे व्यापारी आणि ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या व्यवहारावर कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 50 कोटींचा फंड रिझर्व्ह केला आहे. डिजिटल इंडियाची (Digital India) 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची तयारी केली आहे.

यासाठी कंपनीने 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये तळागाळातील पातळीवर ऑनलाईन उपक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरुन व्यावसायिकांना डिजिटल पेमेंट करण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते आणि कॅशलेस पेमेंटचा अवलंब केल्याबद्दल रिवॉर्ड मिळू शकेल. कंपनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विशेष ऑपरेशन्स सुरु करणार आहे.

पेटीएमच्या CEO ने काय म्हटले आहे ते जाणून घ्या?
पेटीएमच्या CEO विजय शेखर शर्मा म्हणाले की,”भारताने आपल्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. यामुळे प्रत्येकजण तांत्रिकदृष्ट्या मजबूत होतो. पेटीएमची गॅरेंटेड कॅशबॅक देशातील टॉप व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्यांनी डिजिटल इंडियाला यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.”

पेटीएम 1 जुलै 2015 रोजी लाँच झाला होता
शेखर पुढे म्हणाले की, “कॅशबॅक व्यतिरिक्त दिवाळीपूर्वी पेटीएम अ‍ॅपद्वारे सर्वाधिक प्रमाणात व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कॅशबॅकशिवाय मोफत साऊंडबॉक्स आणि IOT उपकरणेही दिली जातील. डिजिटल इंडियाची सुरूवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 रोजी केली होती. त्याचा उद्देश भारताला डिजिटलदृष्ट्या मजबूत बनविणे हा आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment