औरंगाबाद | सध्या शहरात 51 बसेस प्रवाशांसाठी खुल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून आणखी 5 इलेक्ट्रिक बसेस शहरात लवकरच सुरू होणार आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने या 5 इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सोमवारी एसडीसीएलचे मुख्य संचालक व्यवस्थापक राम पावणीकर यांनी दिली आहे.
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत औरंगाबाद स्मार्ट सिटी टीमने देखील भाग घेतला होता यावेळी न्यूके पॅक्टतर्फे सार्वजनिक वाहतूक नियोजन आणि अंमलबजावणी एजन्सीद्वारे इलेक्ट्रिक बस खरेदी प्रकरणी आणि बसचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
एएससीडीएल च्या माध्यमातून डिझेल चालणाऱ्या शंभर बस शहरात प्रवासी वाहतुकीसाठी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 51 बसेस शहरात धावत आहेत. त्याचबरोबर 49 बसेस उद्यापासून प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये ही बस आणि खरेदीची माहिती देण्यात आली असून खर्च, चार्जिंग स्टेशन, सेटअप विविध एजन्सीसोबत संलग्नता आणि निविदा प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एसडीसीएलचे मुख्य संचालक व्यवस्थापक राम पवनीकर उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड व प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांची उपस्थिती होती.




