PNB ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ

PNB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PNB ने FD चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्या ग्राहकांना मिळणार आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन एफडी दर 4 जुलै 2022 पासून लागू होतील. यामुळे ग्राहकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

PNB ने विविध मुदतीच्या FD च्या व्याजदरात 10- 20 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. याशिवाय बँक वृद्ध नागरिकांना बँक अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देत आहे. 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर बँकेकडून 3% व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, जे ग्राहक 46 दिवस ते 90 दिवसांची FD करतात त्यांना 3.25% व्याज मिळेल. बँक आता 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्या ग्राहकांना 5.30% व्याज देईल. यापूर्वी या कालावधीसाठी 5.20% व्याज दिले जात होते. म्हणजेच इथून पुढे ग्राहकांना 10 बेसिस पॉइंट्सचा फायदा होणार आहे. तसेर्च ज्या ग्राहकांनी तीन वर्ष ते पाच वर्षांपर्यंत एफडी केली आहे, त्यांना 4 जुलैपासून 5.30% ऐवजी 5.50% व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.50% व्याज

बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, बँकेचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 150 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज दिले जाऊ शकते. जर त्यांची गुंतवणूक PNB टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असेल तर त्याला सामान्य व्याजदरापेक्षा 100 बेस पॉइंट्स जास्त व्याज दिले जाऊ शकते.

कोणत्या कालावधीत किती व्याज मिळेल?

7 ते 45 दिवसांच्या FD वर – 3.00%
46 ते 90 दिवसांच्या FD वर – 3.25 %
91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर – 4.00%
181 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी FD वर – 4.50%
1 वर्षाच्या FD वर – 5.30%
1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर – 5.30%
2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर – 5.50%
3 वर्षे ते 5 वर्षे FD वर – 5.50%
5 वर्षे ते 10 वर्षे FD वर – 5.60%
1111 दिवसांच्या FD वर – 5.50%