खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ टक्क्यांवरून ७ टक्के केले आहेत. नवीन दर हे १० जूनपासून म्हणजेच बुधवारपासून लागू होतील. आपल्या देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयसह जवळजवळ सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या बचत खात्याचे व्याज दर हे कमी केलेले आहेत.

बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना वर्षाकाठी १ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतचे ७ टक्के व्याज दर देत आहोत. बँकेचे अध्यक्ष आणि कंट्री हेड (ब्रांच बँकिंग, लायबिलिटी, उत्पादन आणि संपत्ती) मुरली वैद्यनाथन म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की यामुळे विद्यमान ग्राहकांना आणि बँक बचत खातेधारकांना चांगल्या रिटर्नसह अधिक बचत करण्याची संधी मिळेल.”

बचत खात्यांसाठी बँकेकडे दोन स्लॅब आहेत – एक लाख रुपये आणि त्याहून अधिक बचत खात्यात १ लाख रुपयांपासून ते साडेतीन लाखापर्यंतच्या ठेवींवर बँकेने दर खाली केले आहेत. यात जवळपास ६ लाख बचत खाती आहेत.

या खासगी बँकेने ग्राहकांना देण्यापूर्वीच खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय या बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या बचत ठेव खात्यातील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी घट केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू झालेले आहेत. आयसीआयसीआय बँकेने ५० लाखांखालील सर्व ठेवींवरील व्याज दर हे ३.२५ टक्के वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्याचवेळी ५० लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवरील व्याजदर ३.७५ टक्क्यांवरून ३.५० टक्के करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment