एच-१ बी व्हिसा बंदीच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंची तीव्र नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हीसवर बंदी घातल्यानं नव्याने अमेरिकेत नोकरी इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे. यावर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिचाई यांनी ट्विट करून भूमिका मांडली. ते म्हणतात की, ‘अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीमध्ये स्थलांतरित कर्मचाऱ्यांचे योगदान प्रचंड आहे. या परदेशी कुशल मनुष्यबळानेच अमेरिका तंत्रज्ञान जगतात आघाडीवर आहे. मात्र आजची व्हिसा निलंबनाची भूमिका निराशाजनक आहे. मात्र गुगल यापुढेही स्थलांतरित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. त्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी गुगल कटिबद्ध आहे,’ असे पिचाई यांनी म्हटलं आहे.

सिलिकॉन व्हॅलीतील गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडून दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी कर्मचाऱ्यांची भरती करतात. त्याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या भारतीय कंपन्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना एच-१ बी, एच-४ व्हिसाच्या आधारे अमेरिकेत पाठवतात. मात्र आता नवीन कर्मचाऱ्यांना पुढील ६ महिने अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामळे या कंपन्यांना मनुष्यबळाची पूर्तता स्थानिक अमेरिकेन नागरिकांना संधी देऊन पूर्ण करावी लागेल. एच-१ बी, एच-४ व्हीसा रद्द केल्याने किमान ५ लाख नोकऱ्या तेथील भूमीपुत्रांसाठी उपलब्ध होतील, असा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज आहे.

कोरोनाचा संसर्ग, ढासळत असलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावर टीकेचे धनी होत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी एच१बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने अमेरिकेत नोकरी इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे अमेरिकेत बेरोजगारीचेही प्रमाण वाढले. दोन महिन्यात अमेरिकेत जवळपास सव्वा दोन कोटी लोक बेरोजगार झाली. अमेरिकेत एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर १४.७ टक्के होता. एच१बी व्हिसा निलंबित केल्यामुळे स्थानिक अमेरिकन युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि बेरोजगारी कमी होईल असा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment