हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात मोबाईलशिवाय (Mobile) कोणताच व्यक्ती नसेल. मोबाईल म्हणजे आपल्यासाठी जीव कि प्राण इतके त्याचे महत्व आपल्या आयुष्यात वाढलं आहे. आपले फोटो, डॉक्युमेंट, आपण मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवत असतो तसेच दैनंदिन जीवनातील अनेक कामे आपण मोबाईल वरूनही करू शकतो. त्यामुळे मोबाईल हा आजकालच्या जगात माणसाची गरज बनला आहे . परंतु कधी तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा पडला तर? विचार करूनच टेन्शन आलं ना? परंतु आता चिंता करण्याची गरज नाही.
टेक्नॉलॉजी मुळे जग खूप पुढे गेलं आहे. त्यामुळे समजा तुमचा मोबाईल कुठे हरवला किंवा चोरीला गेला तरी टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही हरवलेल्या मोबाईल पर्यंत सहज पोचू शकता. गुगल प्ले स्टोअर वरील Google Find My Device या अँपच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील. तुमच्या मोबाईल मध्ये किती टक्के चार्जिंग आहे आणि तुमचा मोबाईल आत्ता कुठे त्याठिकाणची माहिती तुम्हाला लगेच समजते. तसेच जर हरवलेला मोबाईल सायलेंट मोड वर असेल तर या अँपच्या माध्यमातून तुम्ही तो रेगुलर मोडवरही ठेऊ शकता आणि तुमचा मोबाईल लॉक करून त्यातील सर्व डेटा सुरक्षित करू शकता.
हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा –
1) सर्वप्रथम Google Play Store वरून Google Find My Device हे अँप डाउनलोड करून इंस्टॉल करा.
2) अॅप ओपन करा आणि तुमच्या Gmail खात्याने साइन इन करा.
3) तुमचा Gmail पासवर्ड जोडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर नकाशा आणि तुमच्या मोबाईलची माहिती दिसेल.
4) आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्ले साउंड, किंवा डिव्हाइस सेक्युर करणे किंवा इरेज डिव्हाइस यासारख्या इतर बटणांवर क्लिक करू शकता.
5) यांनतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन, बॅटरी टक्केवारी आणि कनेक्ट केलेले नेटवर्क सुद्धा दिसेल.