गुगलने दिली दिवाळी भेट, कमिशन केले अर्धे; याचा फायदा कसा होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील सबस्क्रिप्शन कमिशन कमी करून 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते 30 टक्के आहे. कमिशनचे नवीन दर पुढील वर्षी 1 जानेवारीपासून लागू होतील. अ‍ॅपल स्टोअरवर अ‍ॅपल आणि गुगल या दोघांच्या जास्तीच्या कमिशनवर टीका झाली आहे. वाढत्या टीकेनंतर गुगलला कमिशन कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

“1 जानेवारी 2022 पासून सबस्क्रिप्शन देणाऱ्या डेव्हलपर्सना सपोर्ट देण्यासाठी, आम्ही Google Play वरील सर्व सबस्क्रिप्शनसाठी सर्व्हिस चार्ज 30 टक्क्यांवरून 15 टक्के करत आहोत,” असे गुगलने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.गुगलने म्हटले आहे की, प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स विकत घेणाऱ्यांना 10 लाख डॉलर्सपर्यंतच्या उत्पन्नासाठी 15 टक्के कमिशन आकारले जाईल आणि दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कमिशन आकारले जाईल.

गुगलने म्हटले आहे की, त्याने आपल्या अँड्रॉइड आणि प्ले मध्ये सबस्क्रिप्शन चार्जपासून मिळवलेल्या गुंतवणूकीत गुंतवणूक केली आणि ती सर्व डिव्हाइसेस निर्मात्यांना मोफत उपलब्ध करून दिली. Google Play साठी सर्व्हिस चार्ज फक्त त्या डेव्हलपर्सनाच लागू होते जे डिजिटल वस्तू आणि ससर्व्हिसेसच्या इन-अ‍ॅप विक्रीची ऑफर देतात.

याआधी, गुगलने म्हटले होते की भारतातील डेव्हलपर्स जे डिजिटल वस्तू विकतात मात्र अद्याप प्लेच्या बिलिंग सिस्टममध्ये रजिस्टर्ड नाहीत त्यांच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंतचा वेळ आहे. Google ने सांगितले की, भारतातील हजारो डेव्हलपर्स जे आधीच डिजिटल वस्तू विकण्यासाठी प्ले वापरत आहेत ते या बदलाचे फायदे मिळवू शकतात.सिक्योरिटीसाठी गुगलने काही अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. गुगलने 150 हून अधिक अ‍ॅप्सवर कारवाई केली. या प्रतिबंधित अ‍ॅपवर, युझर्सची वैयक्तिक माहिती आणि पैसे मिळवण्यासाठी चुकीचे डावपेच वापरत होते.

Gmail मध्ये नवीन अपडेट
गुगल आपल्या Gmail युझर्ससाठी काही नवीन फीचर्स आणत आहे. कंपनी वेबसाठी Gmail मध्ये To, Cc आणि Bcc मध्ये अपडेट आणि करेक्शन आणत आहे. गुगलने म्हटले आहे की, या नवीन बदलांमुळे युझर्सना ईमेल लिहिणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

To, Cc आणि Bcc फील्ड वापरताना युझर्सना नवीन राईट-क्लिक मेनू मिळेल. यावर क्लिक करून, युझर्सना ई-मेल मिळवणाऱ्याचे पूर्ण नाव आणि ईमेल दिसेल. येथेच कॉन्टॅक्ट एडिट केला जाऊ शकतो आणि ईमेल ऍड्रेस कॉपी केला जाऊ शकतो.

Leave a Comment